राम मंदिर भूमिपूजनाचे स्वागत अमेरिकेत; टाईम्स स्क्वेअर मध्ये तयारी

0
229

न्यूयॉर्क, दि. ३० (पीसीबी) : अयोध्येतील राममंदिराचं भूमिपूजन येत्या 5 ऑगस्टला होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त देशभरासह जगभरातील राम भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सर्वांच्या नजरा राममंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर लागल्या आहेत. या ऐतिहासिक क्षणाला खास बनवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. भारतासह सातासुमद्रापार अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्येही या क्षणाला खास बनवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअर मधील बिल बोर्ड्स आणि स्क्रीन्सवर भगवान रामाचे फोटो आणि राममंदिराचे थ्रीडी फोटो झळकणार आहेत. जगातील अन्य देशांमध्येही अशाच पध्दतीने या प्रसंगाचे स्वागत होणार आहे.

न्यूयॉर्कमधील भारतीयांची संघटना अमेरिकन इंडिया पब्लिक अफेअर्स कमिटीने 5 ऑगस्टच्या राममंदिर कार्यक्रमाला खास बनवण्याची तयारी केली आहे. कमिटीचे अध्यक्ष जगदीश सेहनी यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा राममंदिराचं भूमिपूजन करतील तो दिवस आमच्यासाठी खास असेल. टाईम्स स्क्वेअरच्या एईडी स्कीन भाड्याने घेण्यात आल्या आहेत. यामध्ये एक नॅसडॅक स्क्रीन आणि दुसरी 17 हजार स्क्वेअर फुटांची मोठी स्क्रीन आहे, जी जगप्रसिद्ध आहे.

5 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत संपूर्ण दिवस हिंदी आणि इंग्रजीमध्ये ‘जय श्री राम’ लिहिलेला स्क्रोल सुरु राहणार आहे. सोबत भगवान श्री राम यांचा फोटो आणि मंदिराचं आर्किटेक्चर थ्री डीमध्ये आणि अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमाचे व्हिडीओ स्क्रीनवर झळकतील, अशी माहिती सेहनी यांनी दिली.
पुढे सेहनी म्हणाले की, जगभरातील हिंदूसाठी आहे ऐतिहासिक आणि आयुष्यात एकदा येणारा क्षण आहे. त्या दिवशी न्यूयॉर्कमधील भारतीय टाईम्स स्क्वेअर येते जमतील आणि मिठाई वाटून आजचा दिवस साजरा करतील.