राम मंदिर बनणार नसेल, तर पुढे सरकारही बनणार नाही – उध्दव ठाकरे  

0
443

अयोध्या, दि. २५ (पीसीबी) – राम मंदिर उभा करण्यास सध्याच्या सरकारला जमणार नसेल, तर पुढेही हे सरकार बनणार नाही. मात्र, राम मंदिर जरुर बनेल, असा इशारा  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला आज (रविवार)  दिला. अयोध्येत येण्यात माझा कोणताही छुपा अजेंडा नाही. देशातील हिंदुंची भावना व्यक्त करण्यासाठी मी येथे आलो आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

उध्दव ठाकरे यांनी अयोध्येत राम जन्मभूमीवर जाऊन रामलल्लाचे सहपरिवार दर्शन घेतले. त्यानंतर   पत्रकार परिषदेत ते बोलत होते.