Desh

राम न्याय आहे. ते कधी अन्यायातून प्रकट होऊ शकत नाही – राहुल गांधी

By PCB Author

August 05, 2020

नवी दिल्ली,दि.०५(पीसीबी) – राम न्याय आहे. ते कधी अन्यायातून प्रकट होऊ शकत नाही, असं म्हणत राममंदिर भूमिपूजनाच्या पार्शवभूमीवर एक ट्विट काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी प्रभुरामचंद्रांच्या गुणांचं वर्णन केलं आहे.

“मर्यादा पुरूषोत्तम भगवान राम सर्वोच्च मानवीय गुणांचं स्वरूप आहे. राम आपल्या मनात खोलवर बसलेल्या मानवतेची मूळ भावना आहे. राम प्रेम आहे. ते कधीच द्वेषातून प्रकट होऊ शकत नाही. राम करूणा आहे. ते कधी क्रूरपणे प्रकट होऊ शकत नाही. राम न्याय आहे. ते कधी अन्यायातून प्रकट होऊ शकत नाही,” असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे.

मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम सर्वोत्तम मानवीय गुणों का स्वरूप हैं। वे हमारे मन की गहराइयों में बसी मानवता की मूल भावना हैं।

राम प्रेम हैं
वे कभी घृणा में प्रकट नहीं हो सकते

राम करुणा हैं
वे कभी क्रूरता में प्रकट नहीं हो सकते

राम न्याय हैं
वे कभी अन्याय में प्रकट नहीं हो सकते।

— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 5, 2020

दरम्यान, अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थित हा कार्यक्रम झाला.