राम कोणाच्या मालकीचा नाही. उद्धव ठाकरेंची श्रद्धा रामावर असेल तर त्यात गैर काय आहे? – जितेंद्र आव्हाड

0
415

मुंबई,दि.२५(पीसीबी) – शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा केली. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंची पाठराखण केली आहे.

राम कोणाच्या मालकीचा नाही. उद्धव ठाकरेंची श्रद्धा रामावर असेल तर त्यात गैर काय आहे?, त्याचा सरकारशी काय संबंध?, असे प्रश्न विचारत आव्हाडांनी उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला पाठिंबा दिला आहे.

राम ही श्रद्धा आहे. मी खंडोबा, कोलकातामधील दुर्गामातेच्या मंदिरात जातो. तुळजापूर, सप्तशृंगीला जातो. देव हा एकच आहे. त्यामुळे ते रामाकडे गेले तर काय फरक पडतो, असंही आव्हाड म्हणाले आहेत.