Chinchwad

रामनगरमध्ये टोळक्यांकडून कोयत्याने कार आणि पत्र्याच्या शेडची तोडफोड; नागरिकांना जीवे मारण्याची धमकी

By PCB Author

October 26, 2018

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – घराजवळ लावलेली कार आणि एका पत्र्याच्या शेडचे कोयत्याने आणि दगडाने तोडफोड करुन कोयता हवेत फिरवत ‘कोणीच आमच्या मधी यायचे नाही’, अशी धमकी देऊन परिसरात दहशत माजवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरुवारी (दि.२५) रात्री एकच्या सुमारास रामनगर चिंचवड येथील महापालिकेच्या मोकळ्या मैदानात घडली.

याप्रकरणी युवराज शाम माने (वय ३६, रा. दत्तनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिजीत जोशी (वय ३०), करण मोहिते (वय २३), अजीत आखाडे (वय २७, सर्व रा. लालटोपीनगर, मोरवाडी) आणि त्यांचे साथीदार विनोद विलास घोडके, अजीत प्रकाश पाटील, गोपाळ नवनाथ जाधव (वय २२), शकील गफार अंगारके (वय २१) आणि धिरज संजय बिराजदार (वय २०) या आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युवराज यांचे रामनगर चिंचवड येथील महापालिकेच्या मोकळ्या मैदानात पत्र्याचे शेड आहे. गुरुवारी त्यांनी त्याच ठिकाणी त्यांची स्वीफ्ट कार देखील लावली होती. यावेळी रात्री एकच्या दरम्यान वरील आठ आरोपी तेथे आले आणि कोयत्याने आणि दगडाने स्वीफ्ट कार आणि पत्र्याच्या शेडची तोडफोड सुरु केली. तोडफोडीचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक जागे झाले आणि बाहेर आले. यावर आरोपींनी त्यांना हवेत कोयता फिरवून, ‘ आमच्या मध्ये कोणी यायचे नाही, नाहीतर खल्लास करुन टाकीन’ यामुळे घाबरलेल्या नागरिकांनी पुन्हा दार खिडक्या लावून घारत घाबरून बसले. इतक्याl फिर्यादी युवराज तेथे पोहचले त्यांनी आरोपींना माजी गाडी आणि पत्र्याच्या शेडची तोडफोड का करताय अशी विचारणा केली असता आरोपी अभिजीत हा युवराज यांच्या अंगावर कोयता घेऊन धावून आला आणि तोडून टाकण्याची धमकी दिली. घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले. याप्रकरणी युवराज यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीसांनी त्यानुसार सातही आरोपींना अटक केली आहे. पिंपरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख तपास करत आहेत.