Maharashtra

रामदास कदमांच्या आरोपांवर खासदार संभाजीराजेंचा पलटवार

By PCB Author

January 08, 2019

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – माझे सचिव आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यामध्ये झालेल्या संभाषणाची  क्लीप ऐकली. त्या क्लीपमध्ये वापरण्यात आलेल्या भाषेचे मी समर्थन करत नाही. ते माझे संस्कारही नाहीत. माझ्या सचिवाला मी कदम यांच्याशी बोलण्याची परवानगी दिली नव्हती, असा खुलासा  खासदार संभाजी राजे यांनी केला आहे.   

तसेच रामदास कदम यांना माझ्याविषयी काय वाटते हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांना काय बोलायचं ते बोलू दे. माझ्याकडे करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे अशा लहानसहान गोष्टींकडे लक्ष द्यायला माझ्याकडे वेळ नाही, असेही संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे.

खासदार संभाजी राजे यांच्याबाबत रामदास कदम यांनी केलेल्या  टिप्पणीमुळे   वाद  निर्माण झाला आहे. संभाजी राजे यांचे सचिव योगेश केदार यांनी कदम यांना परस्पर फोन करून धमकी दिल्यामुळे हा वाद आणखीनच चिघळला होता. या संभाषणाची क्लीपही व्हायरल झाली होती.

दरम्यान, दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या  बैठकीला संभाजीराजे यांनी उपस्थिती  लावली होती. त्यानंतर संभाजी राजे यांनी नारायण राणे यांना मराठा आरक्षणाचे श्रेय दिले होते. या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी संभाजी राजे यांच्यावर टीका केली होती. यावर  संभाजी राजे यांचा सचिव योगेश याने फोनवरून  कदम यांना धमकी दिली  होती.