रामदास आठवले मुंबईमधून लोकसभा निवडणूक लढवणार

0
874

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – रिपब्लिकन पक्षाचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले हे २०१९ मध्ये दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत, अशी माहिती    प्रसिद्धी पत्रकाद्वारे आठवले यांनी दिली. वांद्रे पूर्व येथे रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा आठवले यांनी घेतला. या मतदारसंघात स्थानिक कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेशही आठवले यांनी दिले आहेत.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सध्या महाराष्ट्रातून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. यापूर्वी ते पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच पंढरपूर लोकसभा  मतदारसंघाचे विभाजन झाल्यानंतर शिर्डी येथे लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले यांना २००९ मध्ये  पराभूव स्वीकारावा लागला.

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील चेंबूर, अणुशक्तीनगर, धारावी, नायगाव, वडाळा हे आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ले आहेत. या भागात आठवलेंच्या रिपाइंची संघटनात्मक बांधणीही आहे. दरम्यान, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राहुल शेवाळे हे विद्यमान खासदार आहे.