रामदास आठवलेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको

0
733

पुणे, दि. ९ (पीसीबी) – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर अंबरनाथ येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने रास्ता रोको करून निषेध नोंदवला. पुणे स्टेशन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रस्ता रोको करण्यात आला.  

यावेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आरपीआयचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, शहर संपर्क प्रमुख अशोक शिरोळे, नगरसेविका सुनीता वाडेकर, हिमाली कांबळे तसेच पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

रामदास आठवले हे सामान्य जनतेच्या अडचणी सोडवणारे नेते आहेत. त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळेच त्यांच्यावर हल्ला झाला आहे. त्यामुळे या प्रकरणातील हल्लेखोरांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केली.