राफेल व्यवहार मनोहर पर्रिकरांना मान्य नव्हता; शरद पवारांचा गौप्यस्फोट  

0
663

कोल्हापूर, दि. १३ (पीसीबी) –  राफेल विमान खरेदी  व्यवहार प्रक्रिया दिवंगत माजी संरक्षणमंत्री  मनोहर पर्रिकर यांना मान्य नव्हता,  म्हणूनच त्यांनी संरक्षण मंत्रीपद सोडून  गोव्यात जाण्याचा निर्णय घेतला होता , असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत पवार  बोलत होते.  दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही काही दिवसांपूर्वी मनोहर पर्रिकर यांच्याकडे राफेलप्रकरणी महत्त्वाची माहिती असल्याचे विधान केले होते. त्यानंतर आता शरद पवार यांनी मनोहर पर्रिकर यांच्याबाबत  भाष्य केले आहे.

यावेळी पवार यांनी  मोदींवर टीका केली. मोदींनी  कोणतीच आश्वासने पाळली नाहीत. लोकांची नाराजी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने होत आहे. देशातील संस्थांवर हल्ला होत आहे. संस्था राजकीय कामासाठी वापरतात, असा आरोप त्यांनी यावेळी  केला.