राफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार

0
581

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – राफेल विमान खरेदी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला क्लीन चिट दिली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  कॅगच्या अहवालाबाबत केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली आहे, असा आरोप  पवार यांनी केला आहे. तर    कॅग आणि अॅटर्नी जनरलना संसदेच्या लोकलेखा समिती समोर आम्ही बोलावू, असे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे.  

राफेल विमान खरेदी प्रकरणी कॅगने अभ्यास केला आहे. तसेच संसदेच्या लोकलेखा समितीनेही मंजुरी दिली आहे, असे केंद्र सरकारने न्यायालयाला सांगितले. मात्र, हे पूर्णपणे खोटे आहे, असेही  पवार म्हणाले.

राफेल प्रकरण पब्लिक डोमेनमध्ये आहे. पण कुठे आहे? तुम्ही तरी बघितले का? यामुळे मी हा मुद्दा संसदेच्या लोकलेखा समितीतील इतर सदस्यांसमोर उपस्थित करणार आहे. तसेच कॅगचे संचालक आणि अॅटर्नी जनरल यांनाही समितीसमोर बोलावू, असे खरगे म्हणाले

आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करतो. न्यायालया हे काही तपास संस्था नाही. मात्र, सरकारने धोका दिला आहे. यामुळे आम्ही राफेल प्रकरणी संसदेच्या संयुक्त समितीकडून चौकशी करण्याच्या मागणीवर आम्ही ठाम असल्याचे खरगे यांनी सांगितले.