राफेल प्रकरणावर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच उत्तर द्यावे- संजय राऊत

0
555

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – राफेल लढाऊ विमान खरेदी कराराबाबत रिलायन्सचे नाव भारतानेच सुचवल्याचा गौप्यस्फोट फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी नुकताच केला आहे. त्यामुळे आता यावर मंत्रिमंडळातील इतर कोणीही नाही तर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच उत्तर द्यावं, अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे.