Notifications

राफेल प्रकरणाचे सर्मथन केलेले नाही; शरद पवारांचा खुलासा

By PCB Author

October 01, 2018

बीड, दि. १ (पीसीबी) – राफेल लढाऊ विमानाच्या खरेदी व्यवहाराची माहिती गुप्त का ठेवण्यात आली आहे? असा सवाल करून राफेल प्रकरणाचे मी सर्मथन केलेले नाही,असे  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. सरकार जर या प्रकरणी खुलासा करणारच नसेल, तर आरोप होणारच त्यामुळेच राफेल खरेदीची माहिती संसदेत देण्यात यावी, अशी मागणीही पवार यांनी केली आहे.