Maharashtra

राफेल घोटाळ्याची चौकशी सुरू केल्याने ५६ इंचाच्या छातीत धडकी – छगन भुजबळ

By PCB Author

January 14, 2019

उल्हासनगर, दि. १४ (पीसीबी) – सीबीआय महासंचालक आलोक वर्मा यांनी राफेल घोटाळ्याची चौकशी सुरु केली होती. त्यामुळे ५६ इंचाच्या छातीत धडकी भरल्याने त्यांची उचलबांगडी  केली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांनी केला. 

विकासाचा मुद्दा  दूर ठेवून भाजप सरकार मंदिर – मशिदीचा मुद्दा घेवून धनाचा धंदा करत आहेत.  हा निवडणूक जुमला  आहे. याकडे लक्ष देवू नका, असे आवाहनही  भुजबळ यांनी उल्हासनगर येथे राष्ट्रवादीच्या  परिवर्तन यात्रेनिमित्त् आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलताना केले.

भाजपाला मंदिर नाही बनवायचे तर सरकार बनवायचे आहे. म्हणून मंदिराचा मुद्दा घेवून मंदिर मशिदीचा मुद्दा घेवून दंगा घडवायचा आहे, असा आरोपही भुजबळ यांनी केला.  आमचा राजा जास्त उदार झाला आहे. परंतु पुन्हा फसलात तर लक्षात ठेवा तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. आता यांचे अच्छे दिन कमी उरले आहेत, असेही  भुजबळ यांनी टीका केली.