राफेल करारात ‘घोटाळा’ नाहीच- सर्वोच्च न्यायालय

0
625

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – अब्जावधी डॉलरच्या राफेल विमानखरेदी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मोठा दिलासा दिला आहे. ‘राफेल खरेदी प्रकरणात कोणतीही अनियमितता झाली नाही,’ असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. शिवाय राफेलप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या सर्व याचिकाही कोर्टाने फेटाळून लावल्याने राफेलची ढाल पुढे करून केंद्र सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी हा मोठा झटका असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राफेल प्रकरणी सर्व याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने परखड मते नोंदवली आहेत. ‘राफेल कराराच्या प्रक्रियेवर आम्ही समाधानी असून त्यावर शंका घेण्यासारखं काहीही कारण नाही. यात काही पक्षपात झालाय, असे आम्हाला आढळून आले नाही. त्यामुळे त्यावर अपीलीय प्राधिकारी बनून कराराच्या सर्व मुद्द्यांची चौकशी करणे कोर्टासाठी ठरणार योग्य नाही,’ असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तर ऑफसेट पार्टर्नरच्या पर्यायात हस्तक्षेप करण्याचेही काही कारण नसल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी स्पष्ट केले.