राफेलच्या किंमती जाहीर करण्यास कोणताच धोका नाही – शरद पवार

0
366

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – राफेलच्या किंमती जाहीर करण्यास कोणताच धोका नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी म्हटले आहे. बोफोर्स तोफांवेळी काँग्रेसवर आरोप झाल्यानंतर भाजपाने हीच मागणी केली होती. सुषमा स्वराज यांनी कोणत्याही परिस्थितीत बोफोर्स संबंधीची माहिती जाहीर झालीच पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतली होती, अशी माहिती पवार यांनी यावेळी दिली.

संरक्षणासंबंधीची गोपनीय माहिती जाहीर केल्यास देशाच्या सुरक्षिततेला धोका पोहोचेल, असा युक्तीवाद भाजपकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार एका वृत्तसंस्थेशी बोलत होते.

पवार म्हणाले की, माझ्या मते राफेलच्या किंमती जाहीर केल्यामुळे देशाच्या संरक्षण गोपनीयतेला कोणताच धोका निर्माण होणार नाही. जेव्हा मी यूपीए सरकारच्या काळात संसदेत होतो. तेव्हा भाजपाने बोफोर्सचा मुद्दा उपस्थित केला होता. सुषमा स्वराज यांनी तर बोफोर्स संबंधीची सर्व माहिती जाहीर करण्याची आग्रही मागणी केली होती.