राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेस सोडणार नाहीत; सुजय विखेंचे मोठा खुलासा

0
433

अहमदनगर, दि. १२ (पीसीबी) – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते  राधाकृष्ण विखे-पाटील हे काँग्रेस सोडणार नाहीत, असा खुलासा त्यांचे पूत्र आणि भाजपचे लोकसभा उमेदवार सुजय विखे-पाटील यांनी केला आहे. यामुळे विखेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

विखे-पाटील हे काँग्रेसमध्ये राहणार  आहेत, असे सुजय विखे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. वडील काँग्रेसमध्ये असताना मी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. ही वैयक्तिक बाब आणि निवडणूक आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भाजपाचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांची आज (शुक्रवार)  अहमदनगरमध्ये सभा  होणार आहे.  या सभेत राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये जाहीररित्या प्रवेश करतील,  अशी चर्चा सुरू झाली  होती. मात्र, या चर्चांना पू्र्णविराम मिळाला आहे.