राधाकृष्ण विखे-पाटलांचा राजीनामा घेण्याचा अधिकार मला नाही – अशोक चव्हाण

0
437

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – काँग्रेस नेते व  विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा घेण्याचा अधिकार मला नाही. तसेच  त्यांचा राजीनामा कोणी मागितलेलाही नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज (गुरूवार) येथे स्पष्ट केले आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी गांधी भवन येथे बैठक झाली. त्याआधी चव्हाण पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटीलही  उपस्थित होते. विखे यांचे पुत्र सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे विखे यांच्यावर पक्षातूनच टीका होऊ लागली आहे. विखे राजीनामा देणार का? असाही सवाल केला जात आहे. याबाबत चव्हाण यांनी खुलासा केला आहे.

चव्हाण म्हणाले की, विखे पाटील यांचा राजीनामा घेण्याचा अधिकार  मला नाही.  अहमदनगर जागेवर चर्चा करणे या बैठकीचा अजेंडा नाही.  नगरची जागा  मिळावी, अशी आमची मागणी होती. मात्र, ती पूर्ण झाली नाही, याचे दुःख आहे.  मात्र, याचा आघाडीवर परिणाम होणार नाही, असे चव्हाण यांनी सांगितले.