Maharashtra

राणे जिथे जातात त्या पक्षाची वाट लावतात – दीपक केसरकर

By PCB Author

November 14, 2019

मुंबई, दि.१४ (पीसीबी)- खासदार नारायण राणे यांनी राज्यातील सत्ता स्थापनेच्या बाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची मंगळवारी भेट घेतली होती. दरम्यान, राणे यांनी शिवसेनेला लक्ष केले होते.

याबाबत बोलताना राणे म्हणाले, सत्ता येण्यासाठी जे जे करावं लागेल ते करेन. तसेच शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते उल्लू बनवत असल्याचे ते म्हणाले होते. तसेच राष्ट्रवादी, काँग्रेसच्या बैठका होतात पण निर्णय होत नाही. काँग्रेसचे नेते एकीकडे बोलतात आणि दुसरीकडे कसे वागतात हे शिवसेनेला कळायला हवे. एवढी वर्षे राजकारण करतात, अशा शब्दात राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला होता.

राणे यांच्या टीकेला शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी उत्तर दिले आहे. राणे यांना लक्ष करताना केसरकर म्हणाले की, राणे जिथं जातात त्या पक्षाची सत्ता जाते, असा टोला केसरकर यांनी लगावला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्यात सत्तासंघर्षाचा पेच आजही कायम आहे. कोणालाही सत्ता स्थापन करता आली नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. निवडणूक निकालानंतर राज्यात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. शिवसेना आणि भाजप युतीला पूर्ण बहुमत होते. मात्र, सत्तेतील वाट्यावरुन युतीत वाद टोकाला गेला आणि युती तुटली.