राणे कुटुंब- शिवसेनेतील संघर्ष चिघळणार? निलेश राणेंनी दिले संकेत

0
495

मुंबई, दि. १७ (पीसीबी) –  चार हाडांचा बीएमची चोर, आज कोकणात आला होता आणि परत गेला. बाकीचे लवकरच बोलू, अशा शब्दांत माजी खासदार  निलेश राणे यांनी नाव न घेता शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावरून राणे कुटुंब आणि शिवसेना यांच्यात आगामी काळात संघर्ष चिघळण्याची शक्यता दिसत आहे.     

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी कणकवलीमध्ये जाऊन राणे पिता-पुत्रांवर  जोरदार  शरसंधान साधले होते.  उद्धव ठाकरेंच्या या टीकेला नारायण राणे यांचे चिरंजीव माजी खासदार निलेश राणे यांनी नाव न घेता ट्विटरवरुन  उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

तर नारायण राणे यांनाही उद्धव ठाकरेंच्या टीकेवर  विचारले असता,  नारायण राणे टीका सहन करणाऱ्यापैकी नाही,  माहिती घेऊन बोलेल, असे सांगून त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.  त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या टीकेला राणे कसे उत्तर देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, नितेश राणे यांना कणकवली मतदारसंघातून भाजपने  उमेदवारी दिली आहे. मात्र, शिवसेनेने त्यांच्या विरोधात आपला उमेदवार उभा केला आहे.  पण आम्ही शिवसेनेवर काहीही टीका करणार नाही. मुख्यमंत्र्यांना दिलेले शब्द आम्ही पाळणार, अशी   भूमिका नितेश राणे यांनी घेतली आहे.