राणेंना गांभीर्याने घेऊ नका; अजित पवारांचा नारायण राणेंना टोला

0
386

मुंबई, दि.१३ (पीसीबी)- भाजप नेते नारायण राणे यांना गांभीर्याने घेऊ नका, असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व आमदारांची आज वाय. बी. सी. येथे बैठक होत आहे. या बैठकीला जाण्यापूर्वी अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाशिवआघाडीबाबत भाष्य करत नारायण राणे यांना टोला लगावला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाने शिवसेनाल फसवल असल्याची टीका नारायण राणे यांनी काल केली होती. यावर अजित पवारांनी भाष्य केले. ते म्हणाले की, राणेंना किती गांभीर्याने घेयचं हे तुम्हीचं ठरवा.

दरम्यान भाजप सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करणार असल्याचा दावा भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला होता. मंगळवारी माध्यमांशी बोलताना राणे यांनी हे सूचक विधान केले होते.,या विधानानंतर भाजप सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करणार का ? या चर्चेला उधान आले.