राज ठाकरे लोकसभा निवडणुकीबाबत मंगळवारी करणार मोठी घोषणा

0
824

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देऊन  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचार करण्याची  शक्यता  आहे.  राज ठाकरे यांनी १९ मार्चला पदाधिकाऱ्यांचा मेळावा मुंबईत आयोजित केला आहे. या मेळाव्यात  याबाबत घोषणा  होऊ शकते, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

राज ठाकरे यांनी १९ मार्चला   महाराष्ट्रातील मनसेच्या  पदाधिकाऱ्यांना रंगशारदा या ठिकाणी  बोलावले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांबाबत ते काय भूमिका घेणार  याकडे सर्वांचे लक्ष लागले  आहे. २०१४ मध्ये राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. आता राज ठाकरे राष्ट्रवादीला पाठिंबा  जाहीर करण्याची शक्यता आहे.

९ मार्चला मनसेच्या वर्धापन दिनी केलेल्या भाषणात राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकांबाबत नंतर बोलेन , असे म्हटले होते. आता  हा सस्पेन्स १९ मार्चला संपण्याची शक्यता आहे. या दिवशी  राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा जाहीर करतील आणि नरेंद्र मोदींविरोधात प्रचार करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका घेणार याचा सस्पेन्स त्याच दिवशी संपणार आहे.