राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा; एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांची टिका

0
907

नागपूर, दि. १४ (पीसीबी) – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे विझलेला दिवा आहेत, अशी जहरी टिका एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी केली आहे. नागपुरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित जाहीर सभेत आमदार पठाण यांनी राज ठाकरे यांचा छोटे ठाकरे असा उल्लेख करत ही टिका केली.

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांचेही या सभेत भाषण झाले. त्यांनी सत्ताधारी भाजपवर टिका केली. तसेच काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी एमआयएम पक्षाला सोडणार नसल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

आंबेडकर म्हणाले, “संघाला देशातील कायदा मानायचा नाही. स्वतःच्या संघटनेची नोंदणी करायची नाही. जे विरोधात उभे राहतील त्यांच्याविषयी अफवा पसरवण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधानांच्या खुनाच्या कटात मला अडकवण्याचा प्रयत्न केला.

रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी इतिहास या विषयात पदवी घेतली आहे. सरकारने अर्थशास्त्रातील पदवी असलेल्या व्यक्तीला गव्हर्नरपदी नियुक्ती न करता इतिहासाची पदवी असलेल्या व्यक्तीला गव्‍‌र्हनर म्हणून नियुक्त केले आहे. इतिहासातील पदवीधराची नियुक्ती करून आरबीआयला इतिहास जमा करायचे आहे का?, असा सवालही त्यांनी विचारला.