Maharashtra

राज ठाकरे भडकविण्याचे काम करतात – प्रकाश आंबेडकर

By PCB Author

January 24, 2020

मुंबई, दि.२४ (पीसीबी) – महाराष्ट्रात असे अनेक ‘ मोहल्ले ‘ आहेत. तेथे बाहेरच्या देशातील ‘मुल्ला – मौलवी‘ येत असून मोठे कारस्थान तयार होत आहे. या ठिकाणी पोलिसांनाही जाण्याची परवानगी नाही.याबाबतची माहिती देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या मनसेच्या पहिल्या अधिवेशनात सांगितल आहे.

सीएएच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जे भाष्य केले त्यावरुन एका वृत्तवाहिनीशी बोलताना वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. राज ठाकरे भडकविण्याचे काम करत आहे. जर आपण एखाद्या गोष्टीची सत्यता पडताळली असेल तर त्यांनी राज्यात बांग्लादेशी, पाकिस्तानी मुस्लीम किती याची आकडेवारी द्यावी. पुरावे नसताना राजकीय भाषणबाजी करायची याला अर्थ नाही असे विधान त्यांनी केले आहे.