राज ठाकरे घेणार उद्धव ठाकरे आणि अमित शहांची भेट

0
305

मुंबई, दि,२४ (पीसीबी) – भाषणात ठाकरेंनी पक्षाचा हिदुत्ववादी विचारांकडे कल असेल असे संकेत दिले. तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठींबा देत एकप्रकारे भाजप सोबत आपली जवळीक वाढवण्याचे संकेत दिले. या कायद्याला पाठींबा देण्यासाठी मनसेकडून लवकरच एक मोर्चाही काढण्यात येणार आहे.

राज्यासह देशाच्या काही भागांमध्ये देशविरोधी कट शिजत आहेत. याची माहिती देण्यासाठी मी लवकरच मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. पाकिस्तान, बांग्लादेशमधून आलेल्या घुसखोरांना हाकलून द्या. त्यासाठी माझ्या मोदी सरकारला माझा पूर्ण पाठिंबा असल्याची भूमिका त्यांनी मांडली. ठाकरे म्हणाले, आपण अनेक ज्वलामुखीवर, बॉम्बवर बसलो आहोत. सर्वात महत्वाचं आहे की या देशातील अवैधपणे आलेले बांग्लादेशी पाकिस्तानी मुसलमानांना हकलून दिले पाहिजे, त्यासाठी केंद्र सरकाराला माझे समर्थन आहे. आता मी देशाच्या गृहमंत्र्यांना भेटून, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून याची माहिती देणार आहे. देशातील अनेक भाग आहेत, जेथे काय होतेय हे काही कळत नाही, परंतु मला जसे समजतंय, पोलिसांकडून महिती मिळतेय की काही तरी मोठे होतेय, काही तरी मोठे शिजतंय, असे होत असेल तर पोलिसांना मोकळे हात देणे आवश्यक आहे.