राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार

0
771

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – येत्या २ डिसेंबर रोजी कांदिवलीतील बुराभाई हॉल येथे उत्तर भारतीय महापंचायतीचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

या कार्यक्रमात उत्तर भारतीयांशी ते संवाद साधणार आहेत. दि. १२ ऑक्टोबर रोजी ठाकरे यांना उत्तर भारतीय महापंचायतीने कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. त्यावेळी राज यांनी आयोजकांना कोणतेही आश्वासन दिले नव्हते. परंतु, आता संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंनी निमंत्रण स्वीकारल्याचे ट्विटरवर म्हटले आहे.

दरम्यान, उत्तर भारतीयांविरोधातील नेते अशी प्रतिमा  बदलण्याच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला असावा, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. यापूर्वीही राज ठाकरे यांनी जैन, गुजराती समाजाशी संवाद साधला होता. आता ते उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.