Maharashtra

राज ठाकरे ईडीच्या चौकशीला निघाले आहेत की सत्यनारायणाच्या पुजेला – अंजली दमानिया

By PCB Author

August 22, 2019

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – राज ठाकरे नुकतेच ईडीच्या चौकशीसाठी रवाना झाले आहेत. आपल्या सोबत त्यांनी आपल्या कुटुंबालाही घेतले आहे, त्यावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज ठाकरे यांच्यावर ट्वीटरवरुन जोरदार टीका केली आहे.

राज ठाकरे ईडीच्या चौकशीला निघाले आहेत की सत्यनारायणाच्या पुजेला असा सवाल अंजली दमानिया यांनी विचारला आहे. ट्विटरवर त्यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा ड्रामा? का सहनुभी गोळा करण्याचा हा प्रयत्न, असेही दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, राज ठाकरे ईडीच्या चौकशीसाठी रवाना झाले असून पोलिसांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे. मात्र दमानिया यांच्या ट्विटमुळे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ED च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा drama? का सहनुभी गोळा करण्याचा हा प्रयत्न

— Mrs Anjali Damania (@anjali_damania) August 22, 2019