Maharashtra

राज ठाकरेंविरोधात भाजप दाखविणाऱ्या व्हिडीओंची तपासणी करा – मिलिंद देवरा   

By PCB Author

April 26, 2019

मुंबई, दि. २६ (पीसीबी) –  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात भाजप  व्हिडीओ दाखवणार आहे. त्या व्हिडीओंची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि दक्षिण मुंबई लोकसभेचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

२७ एप्रिलला मुंबईतील प्रचाराची मुदत संपत आहे. त्यामुळे भाजप  त्यादिवशी व्हिडीओ दाखवेल, त्यावर कोणताही पक्ष किंवा नेता उत्तर देऊ शकणार नाही.  भाजप  आरोप करेल ते दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात छापून येईल, त्याचा  मतदारांवर  प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

त्यामुळे भाजपने  व्हिडीओ दाखविण्याआधी त्याची तपासणी करण्यात यावी, असे मागणी देवरा यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात  केली आहे. प्रचाराची मुदत संपल्यावर याबाबत काही छापून येणार असेल किंवा दाखवण्यात येणार असेल, तर ते नियमित असावे अशी मागणी  मिलिंद देवरा यांनी निवडणूक आयोगाला केली आहे.

दरम्यान,  मोदी-शाहांवर हल्लाबोल करणाऱ्या राज ठाकरेंना भाजपदेखील व्हिडीओच्या माध्यमातून  प्रत्युत्तर देणार आहेत. शनिवारी (दि.२७)  होणाऱ्या भाजपच्या सभेत मनसेला मनसेच्याच स्टाईलने उत्तर  देण्यात येणार आहे,  असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले आहे.