Maharashtra

राज ठाकरेंवर मनोरंजन कर लावला पाहिजे- विनोद तावडे

By PCB Author

May 23, 2019

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – राज ठाकरेंवर मनोरंजन कर लावला पाहिजे, अशी बोचरी टीका राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी केली आहे. ते मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहांच्याविरोधात महाराष्ट्रभर सभा घेतल्या. त्यांच्या या सभांची खिल्ली उडवत तावडेंनी त्यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले आहे.

राज ठाकरेंच्या सभांंमुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालावर काहीही फरक पडला नाही. त्या सभांमुळे फक्त सर्वांची करमणूक झाली असल्याचं म्हणत विनोद तावडेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

आघाडीसोबतच राज ठाकरेंचा देखील पराभव झाला असल्याचं विनोद तावडेंनी म्हटले आहे.