राज ठाकरेंनी गोळ्या घालण्याची केलेली भाषा असंवैधनिक – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

0
335

 

मुंबई, दि.५ (पीसीबी) – राज ठाकरे हे जबाबदार राजकीय नेते आहेत त्यांनी गोळ्या घालण्याची केलेली भाषा ही असंवैधनिक आहे. हिंसेला प्रोत्साहन देणारी भाषा कुणीही वापरू नये. जर सगळे असे हिंसक बोलू लागले तर दोन्ही बाजुंनी हिंसाचार होईल.कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर तबलगी जमातीने गर्दी जमविण्याचा केलेला प्रकार निषेधार्ह आहे. तबलगी प्रकरणाची सखोल चौकशी करून कायदेशीर कठोर कारवाई करावी मात्र गोळ्या घालण्याची भाषा कोणी करू नये गोळ्या घालायच्या असतील तर पाकिस्तानातील अतिरेक्यांना घाला असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

आठवले म्हणाले, तबलिगिंनी मरकस साठी गर्दी जमविली. त्यातील लोक देश भर विखुरले. कोरोना चे रुग्ण वाढण्यात काही प्रमाणात मरकस मध्ये सहभागी होऊन आपापल्या राज्यात परतलेल्या तबलीगी जमातीचे लोक कारणीभूत ठरले आहेत. याप्रकरणी सखोल चौकशी करून कठोर जबाबदारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियात भडकाऊ चुकीचे फेक व्हीडियो कोणी प्रसारित करू नये. दोन समाजात तेढ निर्माण होईल असे हिंसक भडकाऊ वक्तव्य कोणी करू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी कायदा सर्वात श्रेष्ठ असल्याचे सांगत भावना भडकवीणाऱ्यांची तेढ निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा ईशारा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची याप्रकरणी भूमिका योग्य असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.

राज ठाकरे हे चांगले वक्ते आणि नेते आहेत. त तबलीगी जमाती कडून होत असलेले प्रकार पाहून राज ठाकरे यांच्या भावना भडकल्या असतील हे आम्ही समजू शकतो मात्र त्यांच्या सारख्या राजकीय नेत्याने लोकशाही व्यवस्थेत गोळ्या घाला असे असंवैधनिक विधान करणे योग्य नाही असा सल्ला ना रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना दिला आहे.