राज ठाकरेंनी एम.एफ.हुसैन यांचा वारसा स्वीकारला काय?

0
807

 मुंबई, दि. १८ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रात गणपतीच्या रुपात मोदींना दाखवून त्यांना  प्रसिध्दी विनायक म्हटले आहे.  यानंतर राज ठाकरेंवर सोशल मीडियातून टीकेची झोड उठविण्यात येत आहे. भाजपचे समर्थन करणारे ‘पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र मिशन २०१९’ नावाचे एक फेसबुक पेज आहे. यावर तर चक्क राज ठाकरे हे व्यंगचित्रकार म्हणून बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी हिंदू देवतांची नग्न चित्रे काढणाऱ्या एम. एफ. हुसैन यांचा वारसा स्वीकारला काय ? असा सवाल करण्यात आला आहे.  

हिंदूंच्या भावना दुखावणारे व्यंगचित्र काढून गणपतीचा अवमान करणाऱ्या राज ठाकरेंची खतना झाली आहे का? असाही प्रश्न या पेजवर केला आहे. तसेच राज ठाकरे मुर्दाबाद, राज माफी मागा, अशी मागणीही या फेसबुक पेजवर करण्यात आली आहे. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दूरदृष्टे होते, त्यांनी राजची खाज आधीच ओळखली, असाही टोला लगावण्यात आला आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी मोदींवर टीका करणारे व्यंगचित्र सोमवारी पोस्ट केले. या व्यंगचित्रात गणपतीच्या रूपात मोदींना दाखवले असून खाली उंदीर म्हणून अमित शाह दिसतात. विशेष म्हणजे त्या गणपतीला मोदी स्वत: ओवाळत आहेत. बाजूला अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह ही नेहमीची मंडळी दिसतात.