Maharashtra

राज ठाकरेंच्या सभा कपिल शर्माच्या ‘कॉमेडी शो’सारख्या होत्या- मुनगंटीवार

By PCB Author

May 23, 2019

नागपूर, दि. २३ (पीसीबी) – एक कपिल शर्माचा कॉमेडी शो होता. आता या लोकसभेच्या निवडणुकीत राज ठाकरेंचा कॉमेडी शो आहे. ठाकरेंच्या कॉमेडी शोनंतर जनता म्हणेल आता लाव रे तो व्हीडिओ निवडणुकीच्या निकालाचा, असे म्हणत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जनतेच्या मनात कितीही विष पसरवण्याचा प्रयत्न केला तरी जनतेने तो पचवला आहे, असे म्हणत मुनगंटीवार यांनी राज ठाकरेंना चांगलच धारेवर धरले आहे.

नाना पटोले माझा चांगला मित्र होता. पण विनाशकाली विपरीत बुद्धी… तो चुकीच्या ठिकाणी गेला. तो शब्दाचा चांगला पक्का आहे, निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राजकीय संन्यास घेणार असल्याचे त्याने सांगितले होते. त्यामुळे माझी सहानुभूती त्याच्यासोबत नेहमी असेल, असेही खोचकपणे मुनगंटीवार म्हणाले आहेत.