राज ठाकरेंच्या “लाव रे तो व्हीडिओ” शब्दाचा नेटवर धुमाकूळ; विरोधकांमध्येही दहशत

0
542

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही आठवड्यांपूर्वीच त्यांचा पक्ष लोकसभा निवडणुक लढणार नसल्याचे जाहीर केले. मात्र आपण पंतप्रधान मोदी आणि भाजपाविरुद्ध प्रचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे राज यांनी मागील आठवड्याभरापासून महाराष्ट्रातील काही ठिकाणी जाहीर सभा घेतल्या आहेत. १२ एप्रिल रोजी नांदेडमध्ये, १५ एप्रिल रोजी सोलापूर तर मंगळवारी कोल्हापूरमधील इचलकरंजी येथे राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. नांदेड येथील सभेपासूनच राज्यभरात राज यांच्या दौऱ्याची चर्चा चांगलीच रंगली.