राज ठाकरेंच्या नाशिकच्या सभेची भाजपने घेतली धास्ती; नाशिक मुख्यमंत्र्यांचे दत्तक शहर

0
396

नाशिक, दि. २० (पीसीबी) – पिंपळगाव येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेने सत्ताधारी भाजपची झोप उडाली असतानाच, आता मोदींच्या सभेपाठोपाठ नाशिकमध्ये होणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेची भाजपने धास्ती घेतली आहे. राज्यभर व्हिडीओ क्लिपद्वारे मोदी आणि शाह यांची पुराव्यानिशी पोलखोल करणारे राज ठाकरे मुख्यमंत्र्याच्या दत्तक नाशिकचाच बुरखा फाडणार असल्याची चर्चा आहे. नाशिकमधील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून राज ठाकरेंना सभेसाठीचे मुद्दे देण्यात आल्याची चर्चा असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कांद्याबाबतचे व्हिडीओ, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पालिका निवडणुकीत केलेले आरोपांच्या व्हिडीओंची मनसेकडून जुळवणी सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे येत्या सभेत राज ठाकरे मोदी, शाह यांसोबतच फडणवीसही रडारवर असल्याने महायुतीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.