राज ठाकरेंची मंगळवारपासून पुन्हा तोफ धडाडणार; चार सभा घेणार    

0
733

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान  मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात  हल्ला चढवला. राज्यभरातील राज यांच्या  जाहीर सभांचा   भाजपने चांगलीच धास्ती घेतली आहे. त्यातच आता राज यांच्या सभांचा दुसरा टप्पा  मंगळवार (दि. २३) पासून सुरू होत आहे.   

राज यांच्या  दुसऱ्या टप्प्यातील पहिली सभा  मंगळवारी (दि.२३) मुंबईत अभ्युदयनगर-काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदानावर होणार आहे.  दुसरी सभा बुधवारी (दि. २४) भांडुपमधील जंगल मंगल रोडवर होणार आहे.  तिसरी सभा कामोठे (गणेश मैदान, खांदेश्वर स्टेशनजवळ) येथे गुरुवारी (दि. २५) होणार आहे. तर चौथी सभा शुक्रवारी (दि. २६)  नाशिकमधील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणार आहे.  या चारही सभा सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहेत.