Maharashtra

राज-उध्दव यांचा मराठा आरक्षणाला विरोध – नारायण राणे

By PCB Author

July 30, 2018

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून आर्थिक निकषाचा मुद्दा पुढे केला जात आहे, असा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते व खासदार नारायण राणे यांनी केला. केवळ मराठा आरक्षणाच्यावेळीच आर्थिक निकषाचा मुद्दा का? असा सवालही राणे यांनी उपस्थित केला.

नारायण राणे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, राज आणि उद्धव ठाकरे यांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे. त्यामुळेच ते आर्थिक निकषाचा मुद्दा पुढे करत आहेत. केवळ मराठा आरक्षणाची मागणी होत असताना आर्थिक निकष का? शिवसेना –मनसेला मराठा समाजाचे कार्यकर्ते चालतात, पण त्यांना मराठा आरक्षण नको, अशी सडकून टीका राणेंनी यावेळी केली.

मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारला किमान तीन महिने लागू शकतात. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येऊन विशेष अधिवेशन बोलावून त्यात कायदा संमत करुन मराठा आरक्षण देता येऊ शकते. त्यासाठी किमान दोन ते तीन महिने लागू शकतात, असे नारायण राणे म्हणाले.