राज्य सरकारचा भाविकांच्या पैशांवर घाला; अशोक चव्हाणांची टीका

0
689

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – भाजप सरकारचे आर्थिक व्यवस्थापन पूर्णपणे  कोलमडले आहे. भाजप- शिवसेना सरकारच्या काळात महाराष्ट्र कर्जबाजारी झाले आहे. नगरमधील निळवंडे सिंचन प्रकल्पासाठी शिर्डी संस्थानाला भाविकांनी  दिलेल्या देणगीवर राज्य सरकारला घाला घालावा लागला आहे. त्यामुळे ‘कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र’ असे म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे, अशी सडकून टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

चव्हाण पुढे  म्हणाले की,  राज्य सरकारचे आर्थिक नियोजन  फसल्याने केवळ चार वर्षात राज्यावर ५ लाख कोटींपेक्षा अधिक कर्जाचा बोजा झाला  आहे. पुरवणी मागण्यांचा तर जागतिक विक्रम या सरकारने प्रस्थापित केला आहे. तसेच महालेखापालांनीही सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर ताशेरे ओढले आहेत. राज्य सरकार पेट्रोल, डिझेलवर दुष्काळी तसेच हायवेवरील दारूची दुकाने बंद केली, म्हणून सेस लावून जनतेचे कंबरडे मोडत आहे.  त्यामुळे मोठमोठ्या वल्गना करणाऱ्या भाजप सरकारचे पितळ  उघडे पडले आहे.

सरकारने गेल्या ३ वर्षात हजार कोटी रूपयांच्या सुधारीत प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत. जलयुक्त शिवारमधील घोटाळे देखील समोर आले आहेत.  वित्त आयोगाने महाराष्ट्रात सिंचन क्षमतेत काडीमात्र वाढ झाली नसल्याचे सांगून सरकारला उघडे पाडले आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने दिलेल्या अहवालात महाराष्ट्रातील  हजार गावांतील भूजल पातळी घसरल्याचे म्हटले आहे.