Pimpri

राज्य माथाडी सल्लागार समितीवर कामगार नेते इरफान सय्यद यांची नियुक्ती

By PCB Author

December 16, 2020

पिंपरी,दि.१६(पीसीबी) – राज्य माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यामध्ये मालकांचे आठ प्रतिनिधी आणि कामगारांचे आठ प्रतिनिधी निवडण्यात आले आहेत. त्यामध्ये कामगारांचे प्रतिनिधी म्हणून शहरातील कामगार नेते इरफान सय्यद यांची निवड झाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाकडून महाराष्ट्र राज्य माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. याबाबत शासनाचे उपसचिव डॉ. श्री ल पुलकुंडवार यांनी पत्राद्वारे कामगार आयुक्तांना पत्राद्वारे सांगितले आहे. या समितीमध्ये एकूण 16 सदस्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात आठ सदस्य हे मालकांचे प्रतिनिधित्व करतात. तर आठ सदस्य हे कामगारांचे प्रतिनिधित्व करतात.

कामगारांचे प्रतिनिधी सदस्य म्हणून डॉ. बाबा आढाव, इरफान सय्यद यांच्यासह आठ जणांची निवड करण्यात आली आहे. कामगार नेते इरफान सय्यद यांच्या निवडीमुळे कामगार वर्गात आनंदाचे वातावरण आहे.