राज्य मंत्रिमंडळाचा शनिवारी विस्तार होण्याची शक्यता  

0
689

मुंबई, ९ (पीसीबी) – भाजप-शिवसेनेच्या आमदारांचे लक्ष लागून राहिलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या शनिवारी (दि. १३) राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. विधानभवनात हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते.

राज्य मंत्रिमंडळात सध्या २५ कॅबिनेट आणि १६ राज्यमंत्री आहेत. त्यात शिवसेनेच्या ५ कॅबिनेट तर ७ राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. शिवसेनेच्या कोट्यातील एक जागा अजूनही रिक्त आहे. त्याचबरोबर भाजपच्या कोट्यातील तीन जागा  भरायच्या आहेत.

मार्च-एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा हा संभाव्य विस्तार  हा अखेरचा  असेल. रविवारीच मुख्यमंत्री दिल्लीत  होते. तेथे त्यांनी वरिष्ठ नेत्यांशी  मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.