राज्य पोलीस महासंचालकांनी घेतला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा आढावा

0
555

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – राज्य पोलीस दलाचे महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी आज (मंगळवार) पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाला भेट दिली. तसेच लोकसभा निवडणुकीचा आणि आयुक्त कार्यालयाचा कामाकाज आढावा घेतला. यावेळी आयुक्तालयातील विविध समस्यांबाबत देखील जयस्वाल यांच्याशी चर्चा झाल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड आयुक्तालय सुरु झाल्या पासून आयुक्तालयास विविध आडचणींना समोरे जावे लागत होते. यामध्ये अपुरी जागा, कमी मनुष्यबळ आणि वाहनांच्या कमतरतेचे प्रश्न म्हत्वाचे होते. यावर आयुक्तालय प्रशासनाने पालकमंत्री बापट आणि गृह विभागाकडे पत्रव्यवहार करुन वारंवार मागणी देखील केली होती. मात्र तेव्हाचे महासंचालक दत्ता पडसलगीकर हे निवृत्त झाल्याने पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या विविध मागण्या लांबणीवर गेल्या होत्या.

मात्र आज महासंचालक सुबोधकुमार यांनी आयुक्तालयाला दिलेल्या भेटीत विविध विभागांची पाहणी करुन कामकाजाचा आढावा घेतला. तसेच आयुक्तालयाला १४ एर्टिगा कार सुपुर्द केल्या.  सुबोधकुमार हे मनुष्यबळाचा प्रश्न देखील तातडीने सोडवतील अशी चर्चा आहे. तर काही दिवसांपूर्वीच महिंद्रा आणि वोक्सवैगन या कंपनीने काही कार आयुक्तालयाला भेट दिल्या होत्या. त्यानंतर राज्य शासनाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला कार दिल्याने राज्य शासनाला उशीरा जाग आल्याचे बोलले जात आहे.