राज्यात युती लोकसभेच्या ४५ जागा जिंकेल; अमित शहांचा विश्वास

0
644

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – भाजप आणि शिवसेना आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक युती करून लढतील, असे  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी  येथे जाहीर केले. राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४५ जागा युती जिंकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या समवेत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शहा बोलत होते.

अमित शहा म्हणाले की, शिवसेनेने बऱ्यावाईट प्रसंगात भाजपला साथ दिली आहे. दोन्ही पक्षांची युती सैद्धांतिक आधारावर आहे.  दोन्ही पक्षात काही मतभेद होते, पण आता ते  दूर झाले आहेत.   त्यासाठी  उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानतो.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार अधिक संख्याबळाने सत्तेवर येईल, असेही ते यावेळी म्हणाले.