राज्यात पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरूच

0
453

मुंबई, दि. १ (पीसीबी) – पेट्रोलच्या दरात आज २४ पैशांची तर डिझेलच्या दरात ३३ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचे आजचे दर ९१.०८ प्रति लिटर, तर डिझेलचे दर ७९.७३ इतके झाले आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर ९१ रूपयांच्या पुढे गेले आहेत.

राज्यातले सर्वात महाग पेट्रोल नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये आहे. इथे पेट्रोल ९३.८२ रूपये प्रति लिटर आहे. मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पेट्रोल ९२ रूपयांच्या पुढे गेले आहे. तर डिझेलच्या ८० रूपयांच्या वर गेल्याने वाहनचालकांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.