राज्यात दुष्काळी भागात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सरकारची तयारी

0
523

मुंबई, दि. २२ (पीसीबी) –  राज्यात दुष्काळग्रस्त भागात पुन्हा एकदा क्लाऊड सीडिंगचा (कृत्रिम पाऊस) प्रयोग करण्याच्या सरकारच्या हालचाली सुरु केल्या आहेत. लांबलेला पावसाचा अंदाज आणि धरणातील पाणीसाठ्यात होणारी घट पाहता सरकारच्या दुष्काळी भागात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सरकारची तयारी केली आहे.

क्लाऊड सीडिंगच्या तरतुदीसाठी मदत व पुनर्वसन विभागाचा वित्त विभागाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यंदा क्लाऊड सीडिंगच्या ओरयोगासाठी ३० कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. वित्त विभागाच्या तरतुदीनंतर राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीने टेंडर्स मागवले जाणार आहेत.

टेंडर निघाल्यानंतर केंद्रातून परवानग्या मिळवण्यासाठी एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस कमी पडल्यास जुलैच्या पहिल्या आठवड्यातपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे.