राज्यातील ७२ हजार रिक्त पदासाठी मेगाभरतीची प्रक्रिया सुरू  

0
770

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – राज्यातील बहुप्रतीक्षित मेगाभरतीची प्रक्रिया सुरु  करण्यात येणार आहे. ७२ हजार पदांच्या भरतीसाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे. मुख्य सचिवांनी मंगळवारी मंत्रालयात आढावा बैठक घेतली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भरती परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी पुढील आठवड्यात  रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिध्द केली जाणार आहेत.

प्रत्येक विभागनिहाय भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. राज्य सरकारच्या कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, वने या विभागांच्या क्षेत्रीय स्तरावरील सुमारे ७२ हजार पदांच्या भरती कार्यवाहीचा मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी आढावा घेतला. सध्या बिंदूनामावली तपासणीचे काम सुरु असून त्यानंतर या भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध केली जाणार आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मेगाभरतीची प्रक्रिया आम्ही सुरु केलेली नाही आणि अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, मराठा अशा सर्वांचे हित कायदेशीरपणे जपल्याशिवाय, मेगाभरती सुरु केली जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते.