राज्यातील महापालिका निवडणूका कोरोनामुळे लांबणीवर ?

0
480

पुणे, दि. १३ (पीसीबी) -: कोरोना रुग्णांची संख्या कितपत वाढेल, याचा अंदाज येत नसल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका निवडणूक आता लांबणीवर जाण्याची शक्‍यता आहे.
निवडणुका म्हटले की प्रचारफेऱ्या, राजकीय सभा, त्यामुळे होणारी गर्दी आणि त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास करायचे काय, असा प्रश्‍न आहे. तूर्तास शासनाने राजकीय तसेच धार्मिक कार्यक्रमांना काही दिवसांसाठी बंदी घातली आहे. निवडणुकीची तारीख जाहीर झाली म्हटले, की भागाभागांत धांदल सुरू होते. त्यातून कोरोना वाढेल, या भीतीपोटीच तूर्तास निवडणुका न घेण्याच्या पवित्र्यात निवडणूक आयोग आहे.

 आजी-माजी नगरसेवक, नव्याने निवडणूक लढविणाऱ्यांनी सध्या जोरदार तयारी सुरू केली होती परंतु कोरोनाची दुसरी लाट राज्यात आली आणि त्यानंतर पुढील वर्षी घेण्यात येणार होत्या पण तूर्तास कोरोनाच संकट परतवून लावण्याची तयारी राज्यसरकार आणि लोकप्रतिनिधी करत असल्याचं चित्र आहे.. 

तर प्रशासकीय राजवट !
कोरोनामुळे जर महापालिकेची निवडणूक जर पुढे ढकलली गेली तर प्रशासकीय राजवट जाहीर होऊ शकते .. यात नियमांनुसार पालिकेचा सगळं कारभार आयुक्त पाहतील ..