Maharashtra

‘राज्यातील प्रत्येक व्यक्तीवर ५४ हजारांचे कर्ज आहे तर…’; रोहित पवार यांचा चंद्रकांत पाटलांना सवाल

By PCB Author

December 05, 2019

महाराष्ट्र, दि.५ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना खूश करण्यासाठी अनेक योजनांच्या माध्यमातून केलेल्या मनमानी खर्चामुळे राज्याच्या तिजोरीवर केवळ भारच पडला असे नसून कर्जाचा बोजाही ६ लाख ७१ हजार कोटींच्या घरात गेला आहे. त्यामुळे आर्थिक श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेताना खर्चावरही र्नि बं ध आणण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपाचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून रस्ता बुजवण्याची घोषणा केली होती. याच घोषणेचा संदर्भ देत रोहित यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे.