राज्यातील जिम, व्यायामशाळा सुरु करा; महेश लांडगे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
313

पिंपरी,दि.31 (पीसीबी) : राज्यातील जिम, व्यायामशाळा सुरु करण्याची मागणी आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अनलॉक-3 जाहीर केला आहे. यासाठी सरकाच्या वतीने नवीन नियमावलीही जारी करण्यात आली आहे.
गृह मंत्रालयाने जारी केलेल्या  नियमावली प्रमाणे 5 ऑगस्टपासून जिम खुले करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत ऑगस्ट महिन्यात काही शिथिलता दिली आहे.
मात्र, जिम आणि व्यायामशाळा सुरु करण्यास अद्याप तरी राज्य सरकारने जिम आणि व्यायामशाळा सुरु करण्यास कोणतेही आदेश किंवा परवानगी दिलेली नाही.
याच पार्श्वभूमीवर फिटनेस व्यवसायातील जिम ट्रेनर आणि जिम मेंबर यांनी 5 ऑगस्टपासून जिम आणि व्यायामशाळा सुरु करण्याची परवानगी मिळावी यासाठी आमदार महेश लांडगे यांची भेट घेतली.
त्या पार्श्वभूमीवर राज्यात जिम आणि व्यायामशाळा सुरु करावेत. या व्यवसायातील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी आमदार लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.