राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या ही केंद्र सरकारचीच चूक – पृथ्वीराज चव्हाण

0
452

मुंबई, दि.२८(पीसीबी) – राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या ही केंद्र सरकारचीच चूक, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाला जागतिक महामारी घोषित केल्यानंतरही केंद्र सरकारनं गांभीर्य ओळखलं नाही. दुर्दैवाने मुंबई विमानतळ सुरू ठेवलं. दररोज 16 हजार प्रवासी येत होते. त्या चौदा दिवसात किती प्रवासी आले असतील? जे प्रवासी आले त्यांना क्वॉरंटाईन केलं नाही. त्यांना होम क्वॉरंटाईन केलं. त्यामुळे हा आजार राज्यात पसरला आणि याची जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारली पाहिजे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान कोरोनाच्या परिस्थितीला महाराष्ट्र सरकार चांगल्या प्रकारे सामोरे जात आहे. केंद्र सरकारने काही सूचना असतील तर त्या कराव्यात. राज्य सरकार सर्व सूचनांचं पालन करतंय, असंही ते म्हणाले.