राज्यातील ऑटोरिक्षा चालकांचे प्रश्न तातडीने सोडविन्याचे नाना पटोले यांचे आदेश

0
436

पिंपरी, दि.२८ (पीसीबी) – मुंबई – आज २७ जानेवारी ला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे अध्यक्षतेखाली विधान भवन,मुंबई च्या कक्ष क्र.४२ मध्ये परिवहन व कामगार विभागाचे  संबंधीत सर्व वरीष्ठ अधिकारीं सोबत राज्यातील ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती  पदाधिकारी यांची  बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीत रिक्षा चालकांच्या प्रश्नावर  सविस्तर चर्चा करण्यात आली,  परिवहन खात्याच्या  अंतर्गत रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात यावे ,  जिल्हा निहाय लोकसंख्येच्या आधारावर रिक्षा  परवाने  परमिट देण्यात यावे असा कायदा लवकरच बनवण्यात येईल , ओला,उबेर च्या बाबतीत  कोर्टात केस  सूरू असून सरकारचे वतीने अभ्यासपूर्ण बाजू मांडून ओला उबेर बाबत नियमावली कठोर करण्यात येईल, खाजगी ऑटोरिक्षा सह जीप मॅजिक मधून होणारी  बेकायदा वाहतूक राज्यातून संपूष्टात आणण्यासाठी भरारी पथक स्थापन करण्यात येईल प्रादेशिक परिवहन समितीवर जिल्हानिहाय  ऑटोरिक्षा चालकांचे प्रतिनिधी अशासकिय सदस्य म्हणून लवकरच नियुक्त करण्यात येतील  असे  बैठकीत ठरवण्यात आले. या बैठकीत विरील प्रमाणे निर्णय घेण्यात  अल्याची माहिती कृती समितीचे महाराष्ट्र सरचिटणीस आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिली. कृती समितीचे कार्याध्यक्ष विलास भालेकर (नागपूर) महासचिव बाबा कांबळे पूणे,उपाध्यक्ष  प्रमोद घोणे  ( मुंबई), गफारभाई नदाफ ( कराड), यांचे नेतृत्वाखाली पार पडली.

रिक्षा चालकांच्या प्रश्ना बाबत लक्ष घालून प्रश्न सोडवण्यासाठी साठी ठोस प्रयत्न केल्या बद्धल, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले,यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, 

या बैठकीला आनंद चौरे (नागपूर)सुरेश गलांडे,फिरोज मुल्ला (सांगली), महेश चौगुले, आरिफ शेख ( मिरज), ईलियास लोधी (अकोला), नरेंद्र वाघमारे (कामठी), मारूती कोंडे (नवी मुंबई), प्रल्हाद सोनवने (जळगाव), महीपती पवार, राजू पूजारी (सोलापूर), किशोर खरताळे, संजय गांगुले (नाशिक), विक्की तामचिकर, विनोद वरखडे (पिंपरी चिंचवड) उपस्थित होते,