“राज्यातलं सरकार पाडण्यात काहीच रस नाही”

0
616

जालना,दि.२२(पीसीबी) – राज्यातील सरकार पाडण्यात आम्हाला काहीच रस नाही. सध्या तीघे जण तिन्ही बाजूने सरकारला खेचत आहेत. त्यांच्या भांडणातूनच सरकार पडणार आहे, असं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

एप्रिल महिन्यात राज्यात ‘ऑपरेशन लोटस’ राबवलं जात आहे. अशा चर्चा सुरु असतानाच रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीबाबत हे वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्रातलं सरकार हे स्थगित सरकार म्हंटलं जातय. देवेंद्र फडणवीस सरकारमधील सगळ्याच निर्णयांना स्थगिती देण्याचं काम सध्याचं सरकार करतंय. असंही रावसाहेब दानवे म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावेत. फडणवीसांच्या चांगल्या निर्णयाला स्थगिती न देता त्याची अंमलबजावणी चालू ठेवावी, असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.