राज्याच्या माजी मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं कोरोना संसर्गाने निधन.

0
244

मुंबई, दि. १६ (पीसीबी) : राज्याच्या माजी मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं वयाच्या 72 व्या वर्षी कोरोना संसर्गाने निधन झालं आहे. नीला सत्यनारायण या महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्त झालेल्या पहिल्या महिला अधिकारी होत्या.

काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याच निदान झालं होतं. मुंबईच्या प्रसिद्ध सेव्हन हिल्स रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली आहे. आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. नीला यांच्या कुटुंबालाही कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याच्यावरती हि उपचार सुरु आहेत. 

त्यांनी महाराष्ट्राचं मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून अतिशय चांगलं काम केलं होतं. अतिशय कडक अधिकारी म्हणून त्यांची प्रशासनात ओळख होती. नीला सत्यनारायण या सनदी अधिकारी होत्या.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त खैरनार यांचं देखील कोरोनामुळे निधन झालं आहे. कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला असून सरकारी अधिकारी हि कोरोनाच्या विळख्यात येत आहेत.